Ad will apear here
Next
आदिवासी भागात शौचालये व सोलर पंपाची उभारणी
फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनचा पुढाकार


पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात १३० शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यातील तिसऱ्या टप्प्यातील वाडा तालुक्यातील बावेघर, हमरापूर व केव गावात ५० शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक सुरेश मेंगडे यांच्या हस्ते नुकतेच झाले.

या वेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे बी. आर. मेहता, ठाणे येथील सैनिक वेल्फेअर संस्थेचे श्री. गायकवाड, वाडा पंचायत समितीचे श्री. शिंदे, विक्रमगढ पंचायतीचे श्री. पवार यांच्यासह गावकरी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘मुकुल माधव’तर्फे व खेरवाडी सोशल वेल्फेअर असोशिएशनच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अत्याधुनिक शौचालये बांधली आहेत.  या आधी वाडा तालुक्यातील सोनाळे गावात ५० शौचालये बांधली असून, सौरदिवे बसविण्यात आले आहेत.



झेडएफ स्टिअरिंग गिअर या कंपनीच्या मदतीने वडवली गावात ३० शौचालये सौरदिव्यांसहित उभारली आहेत. वडवली गावातील नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांच्या सोयीसाठी फाउंडेशनच्या पुढाकारातून सोलर वॉटर पंप बसविण्यात आला आहे. या उपक्रमातून जमलेला एक लाख रुपयांचा निधी सैनिक वेल्फेअर संस्थेकडे सुपूर्द करण्यात आला.

या प्रसंगी कोकण विभागाचे पोलीस अधीक्षक मेंगडे म्हणाले, ‘पुण्यातून पालघरमध्ये येऊन या आदिवासी बांधवांच्या आरोग्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी स्थानिकांनीही या संस्थाना प्रतिसाद देत या सुविधांचा सुयोग्य वापर करावा. आपली व परिसराची स्वच्छता राखणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.’



‘मुकुल माधव’च्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया म्हणाल्या, ‘स्वच्छतेच्या योग्य सोयीसुविधा असतील, तर जीवघेण्या आजारांपासून कुटुंबाचे रक्षण होईल. त्यातून समाजाचे आरोग्य चांगले राहील. उघड्यावर शौचाला बसणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शौचालये आणि सौर दिव्यांसह या भागात पाणी संवर्धनासाठी उपक्रम सुरू आहेत. त्यामध्ये गाळ काढणे, छोटे बंधारे बांधणे आदींचा समावेश आहे. मुंबईपासून ११५ किमी अंतरावर असलेल्या पालघरमधील बहुतांशी आदीवासी गावे प्राथमिक गरजांपासून वंचित आहेत. त्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.’

झेडएफ स्टिअरिंग गिअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष मुनोत यांनी या सामाजिक कार्यात सहभागी होता आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZLPBV
Similar Posts
आदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी पुणे : ग्रामीण भागातील आरोग्य चांगले राहावे आणि परिसरातील वातावरण स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात एकूण २०९ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. त्यातील चौथ्या टप्प्यांत वाडा तालुक्यातील केलटान, सापाने व कारळगाव येथे ७७ शौचालयांचे व सोलर पंपाचे उद्घाटन १५ जून २०१९ रोजी झाले
‘मुकुल माधव’तर्फे शौचालयांसाठी अर्थसहाय्य पुणे : रानावनात भटकंती... आरोग्य, शिक्षण याबाबत अनभिज्ञ... डोंगराळ भागात राहणारे... मुख्य प्रवाहापासून दूर असणारे... इतकी वर्षे उघड्यावरच शौचाला जाणारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवही आता ‘टॉयलेट’मध्ये जाणार आहेत.
‘फिनोलेक्स’ व ‘मुकुल माधव’कडून ‘ससून’ला दोन कोटींचे अर्थसाह्य पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि त्यांचे सीएसआर पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्याकडून ससून सर्वोपचार रुग्णालयाला दोन कोटी रुपयांच्या अर्थसाह्यातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देण्यात आली आहेत. १६ एप्रिल २०१९ रोजी नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या (एनआयसीयू) दुसऱ्या, तर एंडोस्कोपी युनिटच्या पहिल्या वर्धापन
‘ससून’मध्ये आधुनिक लेसर मशीनद्वारे दंतरोपण पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकाराने ससून रुग्णालयात आधुनिक लेसर मशीनद्वारे दांतरोपन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे आता गरीब रुग्णांना दंतरोपन करणे शक्य झाले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language